-
अभिव्यक्ती स्वातंत्र्य : आयटी कायद्यांतर्गत गुन्हा रद्द
नवी दिल्ली : सोशल मीडियातून अथवा इंटरनेटवरून ‘आक्षेपार्ह’ मजकूर पाठविणे हा गुन्हा ठरवून त्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणारे ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट’चे वादग्रस्त कलम ६६ए सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनाबाह्य ठरवून रद्द केले. परिणामी, या कलमाच्या आधारे पोलिसी कारवाई होण्याची टांगती तलवार दूर झाल्याने सोशल मीडिया बेलगाम तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत असतानाच दुसरीकडे न्यायालयाच्या या निकालाने नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वोपरी मानून ते अधिक बळकट केले गेल्याने त्याचे सर्वदूर स्वागतही होत आहे.
मूळ कायद्यात दुरुस्ती करून हे कलम आॅक्टोबर २००९पासून लागू केले गेले होते. या तरतुदीचा दुरुपयोग करून पोलिसांनी सोशल मीडियावर संदेश लिहिणाऱ्या अनेकांना अटक करून तुरुंगात डांबल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत देशाच्या अनेक भागांत घडल्यानंतर या कलमावरून मोठा जनक्षोभ उसळला होता. त्यातूनच
कलम ६६एला आव्हान देणाऱ्या
एकूण १० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेल्या होत्या. न्या. जे. चेलमेश्वर व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने १२२ पानी निकालपत्र देत ‘आयटी’ कायद्याखालील हा गुन्हाच कायद्याच्या पुस्तकातून काढून टाकला.
मात्र, संदर्भित मजकुरामुळे सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची, सामाजिक सुव्यवस्था बिघडण्याची अथवा भारताच्या अन्य देशांशी असलेल्या संबंधांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता असेल तर इंटरनेटवरील अशी वेबसाइट ‘ब्लॉक’ करण्याचा याच कायद्याच्या कलम ६९ व ७९ अन्वये सरकारला असलेला अधिकार मात्र न्यायालयाने अबाधित राखला आहे.
आयटी कायद्याचे कलम ६६ ए राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे असल्याने ते पूर्णपणे घटनाबाह्य ठरते, असे न्यायालयाने नि:संदिग्धपणे जाहीर केले. या कलमाचा दुरुपयोग होऊ दिला जाणार नाही, या सरकारच्या आश्वासनावर, मुळातच घटनाबाह्य असलेले हे कलम, वाचविले जाऊ शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाने म्हटले की, सरकारे येतील आणि जातील पण हे कलम ६६ए कायद्यात कायमसाठी असणार आहे. त्यामुळे सध्या सत्तेवर असलेल्या सरकारने दिलेले आश्वासन कितीही प्राणिकपणे पाळले तरी ते भविष्यात येणाऱ्या सरकारवर बंधनकारक असणार नाही. परिणामी कायदा कसा राबविला जातो याचा विचार न करता या कलमाची घटनात्मक वैधता तपासायला हवी. तसे केले असता हे कलम घटनात्मक निकषांत बसत नाही, असाच नि:संदिग्ध निष्कर्ष निघतो. (विशेष प्रतिनिधी)
प्रत्येक नागरिकास दिलेले विचाराचे, अभिव्यक्तीचे, श्रद्धा बाळगण्याचे आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य हा भारतीय राज्यघटनेचा गाभा आहे. राज्यघटनेने सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक भारताची स्थापना केली आहे. त्यामुळे लोकशाहीसाठी नागरिकांचे वैचारिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वोपरी ठरते.
- न्या. चेल्मेश्वर व न्या. नरिमन,
सर्वोच्च न्यायालय
या कलमाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेली बंधने सरधोपट प्रकारची असून ती अवाजवी आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१) अन्वये नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले असले तरी अनुच्छेद १९(२) अन्वये या स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र ही बंधने देशाचे सार्वभौमत्व व अखंडता, सुरक्षितता, मित्रराष्ट्रांशी संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आदींना बाधा येण्याच्या कारणानेच घातली जाऊ शकतात. परंतु कलम ६६ एच्या गुन्ह्याचे निकष यापैकी कशातही बसणारे नाहीत. सरकारने घातलेली बंधने अधिकारबाह्य आहेत.
या कलमाची भाषा संदिग्ध व ढिसाळ आहे. त्यामुळे इतरांना आक्षेपार्ह, अपमानास्पद, धमकीवजा, गुन्हेगारी स्वरूपाचा, तेढ व वैमनस्य वाढविणारा वाटेल असा मजकूर म्हणजे नेमके काय याचा खुलासा होत नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या सापेक्षतेवर या गुन्ह्याचे स्वरूप सोडण्यात आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मते मांडणे व ती इतरांना पटवून देणे यांचाही अंतर्भाव होतो. अशा मतांचा प्रसार गुन्हा करण्यास प्रवृत्त करण्याच्या टप्प्यापर्यंत जातो तेव्हाच सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण हे कलम माहिती व मतांचा प्रसार करणेही गुन्हेगारी कृत्य ठरविते.
Friday, April 24, 2015
सोशल मीडियाची गळचेपी संपली!
प्रसारमाध्यमांचा वाईट प्रवृत्तींवर धाक
समाजातील वाईट प्रवृत्तींवर माध्यमाचा धाक आहे, त्यांच्यामुळेच
सर्वसामान्यांना न्याय मिळतो, असे प्रतिपादन विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.
सतीश पत्की यांनी केले. येथील महालक्ष्मी भक्त मंडळ संचलित धर्मशाळेच्या
६१व्या वर्धापनदिनी कोल्हापुरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींचा गौरव
करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पत्की बोलत होते.
समाजात पत्रकार आहेत म्हणून चांगल्या गोष्टींचे कौतुक होते आणि वाईट गोष्टींचा पर्दाफाश होतो. समाजातील उपेक्षित घटकांना, पीडितांना त्यांच्यामुळे न्याय मिळतो हे वास्तव आहे. वाईट प्रवृत्तींवर पत्रकारांचा अंकुश असणे ही विशेष बाब आहे, असे डॉ. पत्की म्हणाले. यावेळी भारत चव्हाण (लोकमत), शरद तांबट (मुक्त पत्रकार), सचिन ठिकपुर्ले (पुढारी), बाळासाहेब पाटोळे (पुण्यनगरी), राजेश मोरे (सकाळ), अमरसिंह पाटील (बी न्यूज), शीतल धनवडे (सामना), अमित गद्रे (महाराष्ट्र टाईम्स), अमोल माळी (बी न्यूज), सुभाष गायकवाड (एस न्यूज), अश्विनी टेंभे (केसरी), पूजा मराठे (पुढारी), संग्राम काटकर (तरुण भारत), विश्वास कोरे (दूरदर्शन) आदींचा गौरव करण्यात आला. े यावेळी राजू मेवेकरी, अध्यक्ष नंदकुमार मराठे, राजाभाऊ जोशी उपस्थित होते.

सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा वापर करताना सावधगिरी
सायबर हॅकर्स आपल्या आजूबाजूलाच असतात. आपल्याकडून इंटरनेट
हाताळताना होणाऱ्या चुकांवर ते बारीक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे सोशल साइट
अथवा कोणाला ई-मेल पाठविताना नेहमी ‘थांबा, विचार करा आणि पोस्ट करा’ या
सूत्राचा वापर करायला हवा, असे प्रतिपादन गुरगाव व यूपी पोलिसांच्या सायबर
क्राइम सेलचे सल्लागार तथा इंटरनेट अॅण्ड मोबाइल असोसिएशनचे कन्सल्टंट,
ज्येष्ठ सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे
जितो (जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन) संघटनेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते
बोलत होते. यावेळी टंडन यांनी स्मार्टफोन, सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा
वापर करताना कोणत्या बाबींची सावधगिरी बाळगायला हवी, याबाबतची माहिती
दिली. दरदिवसाला सोशल मीडियावरील क्राइमच्या घटना ऐकावयास मिळतात. या घटना
लहान मुलांकडून सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याने सर्व पालकांच्या दृष्टीने
चिंतेची बाब आहे.
२०१३ मध्ये दाखल झालेल्या पाच हजार ६९३ सायबर गुन्ह्यांमध्ये तीन हजार ३०१ गुन्हे १८ ते ३० वयोगटातील तरुणांकडून घडले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना खबरदारी घ्यायला हवी. विशेषत: तरुणींनी याबाबत अधिक दक्ष असायला हवे. इंटरनेट बॅँकिंग, स्मार्टफोनचा वापर करताना सर्व सुरक्षेच्या मुद्यांचा अभ्यास करायला हवा, अन्यथा हॅकर्सच्या जाळ्यात अडकावे लागेल. स्मार्टफोनच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी, हॅकर्सचा त्यावर डोळा आहे, हे विसरू नये.
सध्या देशात ३० कोटी जनता इंटरनेटचा वापर करते. मात्र, यातील काहींच्या प्रायव्हसीबाबत माहिती ठेवतात. आपला मोबाइल, लॅपटॉप यावर दिलेल्या प्रायव्हसीचा कटाक्षाने वापर करायला हवा. कारण हॅकर्स कुठलीही वेबसाइट अथवा माहिती हॅक करण्यात तरबेज झाल्याने प्रचंड धोका वाढला आहे. वाय फायचा वापर करताना मोडीयमचा पासवर्ड बदला. डब्ल्यूईपी न ठेवता डब्ल्यूपीके-२ या मोडवर ठेवा. फ्रिक्वेन्सी कमी ठेवा.आता तर सरकारी वेबसाइट हॅक करण्याइतपत त्यांची मजल गेली असून, मध्यतरी सीबीआयची अधिकृत वेबसाइट हॅकर्सनी हॅक केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशात घडलेल्या काही धक्कादायक घटनांची रक्षित टंडन यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान त्यांनी केले.

Subscribe to:
Comments (Atom)